कामगार कष्टकऱ्यांच्या योजनांची फळ निष्पत्ती तपासण्याची आवश्यकता !!

कामगारांची अज्ञानता शिवाय कागदपत्रांची पूर्तता करण्याची कसरत......

0
391

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६ साली कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते, अनेक आदेशांची पायमल्ली होते तशी या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात वीटभट्टीवर, बांधकाम मजुरी करणारे तथा ईतर कष्टाची कामे करणारे खरे कामगार अशिक्षित असल्याने व योजनेची पुरेशी माहिती नसल्याने कामगार नोंदणी पासून वंचित असल्याचे सतत्याने पहावयाला मिळते…

परभणी येथून जवळच असलेल्या कौडगाव मार्गावर वीटभट्टीचा कामगार सांगत होता गत २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी जाऊन त्याच्या आधारकार्डसह इतर कागदपत्रे पाण्यात वाहून गेली, परभणी आपत्ती व्यवस्थापनाकडे अर्ज करूनही काही मदत तर भेटलीच नाही पण आधार कार्ड हरवल्याने कामगार नोंदणीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

श्रमिक विश्व….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here