संजीव चांदोरकर
जितेंद्र भावे यांच्या नासिक मधील आंदोलनाने नाट्यपूर्ण रित्या उपस्थित झालेल्या इश्यूच्या निमित्ताने
खाजगी कोर्पोरेटकडे असणारी वित्तीय ताकद,त्यांचे असणारे राजकीय व नोकरशाहीतील संबंध, उद्या कोर्टात जायची वेळ आली तर त्यांच्याकडे असणारी कॉर्पोरेट लॉयर्सची फौज आणि वेळ पडली तर गुंड आणि बाउंसर्स एका बाजूला
आणि
रोगाने / मरणाच्या भीतीने , विशेषतः आता कोरोना काळात , आधीच पैशाने , भावनिक रित्या अर्धा झालेला रुग्ण व त्याचे नातेवाईक
हि लढाई असमान लढाई आहे ; आणि त्यात नेहमीच खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जिंकतात / पुढेही जिंकतील
पण या सगळ्यात शासन कोठे आहे ?
(खरेतर सर्व प्रकारची) कॉर्पोरेट नफा कमावण्याचा जो गेम खेळत असतात तो काही जंगल-राज नाही
त्या गेमचे सामाजिक , राजकीय, आर्थिक नियम आहेत / रुलबुक आहे
आणि लोकशाहीत ते जनतेने निवडलेल्या जनप्रतिनिधींनी संक्टिफाय केलेले असते ; अस्तित्वात असणारे काही नियम अपुरे वाटले तर ते सतत बदलत देंखील नेता येतात
म्हणून खाजगी हॉस्पिटल्सच्या नफेखोरी बद्दल चर्चा सीमित न ठेवता शासन संस्थेला आपल्यासाठी उत्तरदायी ठेवले पाहिजे ; सतत शासन यंत्रणेबद्दल चर्चा झाल्या पाहिजेत
कंपनी कायदा , इस्पितळांना लायसेन्स देताना घातलेल्या अटी , इस्पितळांचे कॉस्टिंग आणि त्यांचे वार्षिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट / ताळेबंद याचे शव विच्छेदन केले गेले पाहिजे
लक्षात घ्या या खाजगी हॉस्पिटल्स मध्ये काम करणारे डॉकटर्स , नर्स , इतर स्टाफ, ऑफिस मध्ये काम करणारे , बिल बनवणारे , बिल वसुलीची धमकी देणारे , आजूबाजूला फिरणारे बाऊन्सर्स
सारे सारे गरीब , निम्न , माध्यम वर्गातून आलेले असतात
मग त्या साऱ्या व्यक्ती अशा निर्दयी पद्धतीने का वागतात ? त्यांच्या घरात , नातेवाईकांत , मित्रात , शेजाऱ्यात कोरोनाने उद्धवस्त झालेली . मृत्यू पावलेली कुटुंबे नसतील ?
उघड आहे या साऱ्या व्यक्ती त्यांच्या मनाविरुद्ध वागतात
मग तसे वागायला त्यांना कोण भाग पाडत असते ? तुम्हीच विचार करा
कोरोना उद्या संपेल ; पण कोरोना च्या निमित्ताने नफेखोरीमुळे आजारी झालेली आपली आरोग्यव्यवस्था आरोग्यदायी करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घ्यावा लागेल
खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि सेवा घेणारे नागरिक यांच्या रस्सीखेचीत शासन यंत्रणा कोणाच्या बाजूने असणार हा निर्णायक / कळीचा मुद्दा शाबीत होईल
संजीव चांदोरकर.