आरोग्य सेवेसारख्या क्षेत्रातील पदे जाणीवपूर्वक रिक्त ठेवून सरकारने कित्येक नागरिकांच्या आयुष्याला धाब्यावर बसवले आहे. अशा प्रकारे अत्यावश्यक सेवांमध्ये हलगर्जीपणा करून एकीकडे बेरोजगारी तर वाढविलीची आणि दुसरीकडे कित्येक गाव-खेड्यांच्या पातळीवर चालू शकत असणारी आरोग्यव्यवस्था देखील अनास्थेकडे नेली.
त्यामुळेच तोकडी झालेली व्यवस्था कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांच्या माथी मारली गेली आणि आज लोकांची काय अवस्था झाली आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. सुदृढ आरोग्यासाठी एक सुदृढ आरोग्यव्यवस्था घडवण्याचे आव्हान लोकायतच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रमिक विश्व न्युज