परभणी :(३१) जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थापित अस्थि रुग्णालयातील प्रशासनाचा गैरव्यवस्थापणामुळे दर रोज अनेक अस्थि आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब-आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील रुग्णाणची प्रचंड प्रमाणात हेळसांड होते आहे.कोरोना पश्चात अस्थि रुग्णालयाची इमारत पुरर्वत हाडाच्या उपचारार्थ सुरु केल्या नंतर हि सदर ठिकाणी औपचारीतक मात्र वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी बाहय विभागातील तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांची तपासणी करत असून,जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून नियुक्त डॉक्टर सर्रास गैरहजर रहात असल्याने अनेक रुगणांना औपचारिकता मात्र उपचार घेऊन परतावे लागत आहे.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक तथा निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे सदर प्रकारे चालवण्यात येणाऱ्या अस्थि रुग्णालयातील कारभारावर काही नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे.परभणी जिल्हा अस्थि रुग्णालयातील नियुक्त डॉक्टर तथा कार्यपद्धती याची चौकशी करून सुधारणा करण्यात याव्यात,अशी मागणी रुग्ण तथा नातेवाईकांकडून होत आहे.
परभणी जिल्हा अस्थि रुग्णालयात अपंग व्यक्तींचा तपासणी अनुषंगाने सप्ताहात दोन दिवस मंगळवार व गुरुवार तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते,सदर तपासणी साठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत वेळ नोंदणी करिता वेळ निश्चित केलेला आहे,परंतु प्रत्येक्षात सदर दिवशी केवळ ६० अपंगांना टोकन देण्याची पद्धती चालवली जात असून,परिणामी परभणी ग्रामीण भागातील येणाऱ्या अपंग व्य्वक्तींना टोकन संपल्याचा कारणाने परत जाणवायची व आर्थिक तथा मानसिक भुर्दंड सहन करण्याची परिस्थिती पाहायला मिळते आहे.विशेष म्हणजे सदर ६० टोकन देण्याची पद्धती कोणत्या आदेशनव्ये अस्थि रुगणालाय राबवत आहे हे सांगितले जात नाहीये. अपंगांना मोठ्या अवघडल्या स्थितीत गर्दी करून आगोदर टोकन करिता आणि टोकन प्राप्त झालेच तर पुन्हा तपासणी करिता तासंतास उभे राहावे लागत आहे.कोणी पायाने अपंग आहे,कोणी इतर प्रकारे अपंग आहे त्यांना किमान बसण्याची सुविधा रुग्णालय प्रशासनाने करून द्यावी अशी नागरिकांकडून मागणी होते आहे.
श्रमिक विश्व रिपोर्ट