![](https://www.shramikvishwa.com/wp-content/uploads/2022/05/IMG-20220518-WA0006-683x1024.jpg)
“वीस टक्के व्याजाने पाच हजार उचलले काल… आज डिचार्ज करायचाय, नगरसेवकाचं पत्र द्या म्हणलेत दवाखान्यात.” ही कहाणी आपल्या सर्वांच्याच घरातली. आज नाही कर उद्या अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. एकतर कर्ज काढून उपचार करा, नाहीतर कुणाच्या तरी हातापाया पडा.
अनेक लोकांना सरकारी योजना व सेवा-सुविधांची माहिती मिळत नाही. खाजगी दवाखान्यात भरती केल्यावर कुणी याबाबत नीट सांगत नाही. बऱ्याच दवाखान्यांमध्ये आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी हक्काच्या योजना आणि तरतूदी असताना देखील त्याची माहिती मिळत नाही.
हॉस्पिटलमधील पेशंटचे हक्क, योजना, मोफत किंवा कमी खर्चात उपचार व तपासण्या, हॉस्पिटलमधील तक्रारी सोडवण्यासाठीची माहिती, मदत मार्गदर्शन साथीकडून करण्यात येईल.
साथी हेल्पलाईन- 9422328578
सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत
साथी हेल्पलाईनचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि अडचण आल्यावर नक्की फोन करा. आज तुम्हाला अनुभव आला की पुढे तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकाल.
@श्रमिक विश्व न्यूज