अर्थव्यवस्थाचा आणि देशातील सामाजिक , धार्मिक, राजकीय वातावरणाचा काय संबंध ?
अर्थव्यवस्थेमध्ये एक आश्वासक वातावरण निर्मिती व्हावी लागते ; तरच अर्थव्यवस्थेला उभारी येते ,
याउलट देशातील सामाजिक , धार्मिक उन्मादाचे , हिंसेचे वातावरण नागरिकांमध्ये एकप्रकारची असुरक्षितता तयार करते , त्यामुळे तिच्यात साचलेपण येते किंवा ती गाळात देखील जाऊ शकते.
नागरिकांच्या / ग्राहकांच्या / कंपन्यांच्या / उद्योजकांच्या मनात भविष्यबद्दलचा विश्वास हा सर्व आर्थिक व्यवहारांचा पाया असतो ; त्याला तडे गेले कि
देशात हिंसक वातावरण असेल तर लोकांना उपभोग घ्यावासा वाटत नाही ; ते पैसे असून नवीन खरेदी / खर्च करत नाहीत ; जीडीपी आक्रसते
भविष्य अंधकारमय वाटले तर नागरिक उपभोगावर कमी खर्च करतात ; बचती करतात कारण अडीनडीला पैसे हाताशी हवेत ; जीडीपी आक्रसते
कंपन्या / उद्योजक नवीन भांडवली गुंतवणूक पुढे ढकलतात कारण नवीन उत्पादनाला नवीन गिऱ्हाईक मिळणार नाही अशी भीती वाटते ; आताची आणि भविष्यातील जीडीपी आक्रसते
कर्ज देणाऱ्या संस्था कर्ज देताना हात आखडता घेतात ; रिस्क ऍव्हर्जन वाढते ; सरकारी रोख्यात पैसे गुंतवले जातात ; अर्थव्यवस्थेची गती खुंटते
तरुणांना आपले भविष्य धूसर आहे असे वाटले तर विषयाचा खूप अभ्यास करावा , नवीन तंत्रज्ञान , वस्तू शोधून काढाव्यात , जोखीम घ्यावी असे त्यांना वाटत नाही ; त्याचा परिणाम देशाच्या आर्थिक भविष्यावर होतो
या सगळ्याची जबाबदारी राजकीय नेत्यांवर असते ; हे ना बॅंकर्सचे काम आहे , ना नोकरशाहीचे , ना अर्थतज्ञांचे , ना कोर्पोरेटचे
संजीव चांदोरकर
श्रमिक विश्व न्यूज