परभणी(23) जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण नोंदणी कक्षात आज घडीला दोन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही तथा आभा कार्ड ( Unique Card ) बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती प्रसाराचे अनेक ठिकाणी प्रयत्न होत असताना दर दिवशी मोबाईल ॲप्लिकेशन वर स्कॅन करून थेट नोंदणी करणाऱ्या रूग्ण अगर नातेवाईकांची संख्या एकूण दर दिवशी नोंदणीच्या अर्धी सुद्धा नाहीये.
डिजिटल इंडिया मध्ये सोयी उपलब्ध असताना रांगेत ताटकळत थांबणाऱ्यांची संख्या अधिक आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दर दिवशी सरासरी होणारी नोंदणी ही 700 ते 800 रुग्ण आहेत त्यात 500 पेक्षा अधिक नोंदणी या ऑफलाईन होत असल्याचे पाहायला मिळते.
आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून एप्रिल 2022 मध्ये तालुकास्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले.केंद्र शासनाकडून या आरोग्य मिळावे प्रभावीपणे व यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा स्तरावर नियोजन झाले.यात आभा कार्ड ( Unique Card ) जनजागृती शिबिरांचाही समवेश करण्यात आला.राष्ट्रीय आरोग्य अभियान,अतिरिक्त अभियान संचालक मुंबईच्या वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन करिता (स्टेट नोडल अधिकारी) जिल्हा नोडल अधिकारी नियुक्तीचे अहवाल मागवण्यात आले त्यालाही आता तीन वर्षाचा कालावधी लोटत आला आहे. यात आयुष्यमान भारत डिजिटल मिशन( ABDM ) हा केंद्र शासनाचा महत्त्वकांशी प्रकल्प असून यामध्ये राज्याचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे नमूद करून यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (ADHO ) यांच्या जिल्हा स्थापन अधिकारी ( VERIFIER ) नेमणुका करण्याचे ही सोपस्कार पूर्ण झाले आहेत.
https://abha.abdm.gov.in/abha/v3/register/aadhaar