सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी जन आरोग्य अभियान महाराष्ट्राच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने आरोग्य हक्कासाठी जनतेचा कौल अशी मोहीम सुरू केली आहे.जन आरोग्य अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य हक्कासाठी काम करणाऱ्या विविध संस्था तथा संघटनांची संयुक्तरित्या चालवलेली मोहीम आहे.कोरोना महामारीच्या काळातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकणाची अधोरेखित झालेली गरज आणि शासन स्तरावरून कायम आरोग्य प्रश्नी धोरण लकव्याच्या परिणामी महाराष्ट्रात उत्तरोत्तर सार्वजनिक आरोग्य विभागाची निर्माण झालेली विदारक स्थिती याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जन आरोग्य अभियान मागच्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
पाहीली फेरीत,प्रिय मतदार जागा हो,आरोग्य हक्काचा धागा हो!
आरोग्य हक्कासाठी मतदान करा ! अश्या प्रकारचे आवाहन करण्यात आले असून,सोबत लिंक देण्यात आलेली आहे.
हलगी, धुराळा, रणधुमाळी, मतदाता राजा … नाही नाही तसलं मतदान नाही. तुमच्या-आमच्या आरोग्य हक्कासाठी, सत्तेतल्या सरकाराला जनतेनं कौल द्यायचा आहे. गेल्या दीड वर्षाच्या कोविडच्या अनुभवानंतर आपण आत्ता कुठं कोविडच्या साथीमधून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘सर सलामत तो पगडी हजार!’- तसं आपला दवाखाना बळकट तर सगळं खरंय बघा. म्हणून आपण सगळ्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी ‘आपला निर्धार, आरोग्य अधिकार’ यामध्ये सहभागी व्हा. अभियानांतर्गत आजपासून ‘जनतेचा कौल’ सुरू होत आहे. तुमचं मत तर अत्यावश्यक आहेच, पण याबद्दल चार-चौघांस्नी पण सांगायाचंय.
चला, मतदान करूया, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जनतेने दिलेला कौल मान्य करायला सरकारला भाग पाडूया.
खालील लिंक वर जाऊन पटापट तीन कळीच्या प्रश्नांवर आपलं मत टाका.
janarogyaabhiyan@gmail.com
https://www.facebook.com/janarogya/
@jan_arogya
WA 7387976862
श्रमिक विश्व न्यूज