युरोपात जर्मनी , बेल्जीयम आणि इतर देशात नद्यांना महापूर , प्रलय : कोई नही बच पायेगा ; श्रीमंत राष्ट्रे , गरीब राष्ट्रे कोई नही.
याआधी कधीही न पाहिलेली दृश्ये ; मध्य युरोपात दिसत आहेत ; शहरांच्या रस्त्यांच्या नद्या , घराघरात पाणी , झाडे उन्मळून पडलेली, हताश जनता.
एकट्या जर्मनीत १५० मृत्यू आणि १३०० बेपत्ता हि सरकारी आकडेवारी (बेपत्ता म्हणजे मृत शरीर हातात आलेले नसते म्हणून बेपत्ता हे सर्वाना माहित असते)
आर्थिक नुकसान किती बिलियन्स याचा अंदाज बांधता येईल.
ऑस्ट्रेलियात वणव्यांनी जंगले भस्मसात , कॅनडा , अमेरिकेत तपमान ५० च्या वर , भारतीय उपखंडत पावसाचा लहरीपणा , युरोपात प्रलय …… तुम्हीच यादी करा.
या सगळ्यात सामायिक धागा आहे : सर्व निसर्गाशी निगडित आहे , मनुष्याच्या अधिकार कक्षेच्या बाहेर , हे असे या आधी झालेले ऐकिवात नाही असे लोक म्हणतात आणि हे वारंवार होत आहे.
शाळकरी मुले याला अस्मानी म्हणून लेबल लावतील ; पूर्वीपासून मनुष्य निसर्गापुढे कसा हतबल राहिलेला आहे यावर निबंध लिहितील किंवा वक्तृत्व स्पर्धा भरवतील.
बुद्धीने प्रामाणिक असणारे, शास्त्रज्ञांचे ऐकतील, त्यावर मनन करतील काही गोष्टी मान्य करतील.
याचा संबंध गेली काही दशके विकसित राष्ट्रांकडून बेजबाबदार ज्या पद्धतीने कार्बन एमिशन्स झाले त्याचा आता कडेलोट झाला आहे.
पुराच्या पार्श्वभूमीवर जर्मनीत ग्रीन्स कार्यकर्त्यांनी जी आकडेवारी पुढे आणली आहे त्यावरून दिसते.
गेली काही दशके अर्थसंकल्पाचा आकार कमी ठेवण्यासाठी पूरनियंत्रण , धरणांची डागडुजी , वन संवर्धन यावर खर्च कमी करण्यात आले.
दुसऱ्या बाजूला मोठ्या कोर्पोरेट्सना आयकरात कपात देणे , संरक्षण साहित्य यावर अर्थसंकल्पातील तरतुदी वाढत्या राहिल्या.
आजूबाजूचे प्रश्न वरकरणी गुंतागुंतीचे वाटतात ; पण स्वतःच्या बुद्धीवर आत्मविश्वास ठेवा , जाणून घ्यायची भूक जागती ठेवा आणि सुटे सुटे वाटणारे बिंदू जोडायला शिका , बस्स.
संजीव चांदोरकर.