नाशिक : कोरोना काळातील महाराष्ट्र शासनाच्या दरनियंत्रण आदेशाचे खासगी हॉस्पिटल्सनी उल्लंघन करून रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले आहेत का ? याबाबत ‘महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ आणि ‘जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र’ यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये राज्यव्यापी सर्वेक्षण केले आहे. या सर्व्हेक्षणात राज्यातील ३४ जिल्ह्यातील कोरोना उपचार घेतलेल्या अडीच हजार पेक्षा जास्त रुग्णांचा आणि एक हजारहून अधिक कोरोना विधवांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र आणि जन आरोग्य समन्वय समिती, नाशिक संयुक्तपणे २३ सप्टेंबर २०२१ रोजी नाशिकमध्ये ‘संताप सभा’ आयोजित करत आहे. यावेळी प्रभावित कोरोना विधवा महिलांचे खासगी दवाखान्यांतील अनुभव, सर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन, आणि सर्वेक्षणातून येणारे गंभीर निष्कर्ष तपशीलवार मांडले जातील.
या सभेला जोडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संताप सभा व पत्रकार परिषदेसाठी प्रसारमाध्यमांचा वृत्तवाहिनी/वृत्तपत्रातर्फे प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
संताप सभा, सर्व्हेक्षण अहवाल प्रकाशन व पत्रकार परिषद दि.२३ सप्टेंबर २०२१ वेळ: दुपारी २.०० ते ३.३० पत्रकार परिषद- दुपारी ३.३० ते ५.०० ऑनलाईन पत्रकार परिषदेसाठी उपस्थिती कळवावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.जेणेकरून दि. २३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी लिंक पाठविण्यात येणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक येथे संताप सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
संताप सभेचे आयोजन प्रभावित कोरोना एकल महिला / विधवा महिला, श्री. हेरंब कुलकर्णी (महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती) डॉ. अभय शुक्ला (सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ) श्री. जितेंद्र भावे (रुग्ण हक्क कार्यकर्ते) श्री. गिरीश भावे (जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र)जन आरोग्य समन्वय समिती, नाशिक वतीने करण्यात आले आहे.
श्रमिक विश्व न्यूज
संपर्क- हेरंब कुलकर्णी- 8208589195, गिरीश भावे- 9819323064, संतोष जाधव- 9552519677, विद्या कसबे- 9156676502