१६ जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिना निमित्त राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्या वतीने दादर(पूर्व) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे ” घरकामगार कामगार हक्क सभा ” आयोजित करण्यात आली होती,या सभेला बहुसंख्या घरकामगार महिलांची उपस्थिती राहिली.
या महिलांनी खालील मागण्या राज्य सरकारकडे या वेळी केल्या…
१) २००८ च्या कल्याणकारी कायद्याला कामगार हक्क आधारित कायद्याचे स्वरूप देवून योग्य त्या सामाजिक सुरक्षा कायद्यांची अंमलबजावणी करावी
२) २०११ ते डीसेंबर २०२१ पर्यंतच्या सगळ्या घरकामगारांना कोव्हीड काळात घोषीत केलेले रक्कम त्वरित मिळावी व तीची लाभार्थी मुदत वाढवून सन मे २०२२ पर्यंत सर्व नोंदीत घरकामगारांना कोव्हीड काळ संपे पर्यंत देण्यात यावी.
३) कोव्हीड काळातील व्रुद्ध घरकामगार महीलांची सामाजिक स्थिती बघता तातडीने रु.१०,०००/- ची सन्मान धन योजना या वयस्कर घरकामगार महीला ना लागू करावी.
४) मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्ड ची स्थापना करावी.
५) ज्या वृद्ध घरकामगार महीलांची वयोमर्यादे मुळे मंडळातील नोंदणी संपुष्टात आली आहे त्याही घरकामगार महिलांना कोव्हीड काळातील मदत नीधीचा लाभ देण्यात यावा.
६) सामाजिक सुरक्षेची खात्रीशीर हमी म्हणून घरकामगार महीलांना निव्रुत्ती वेतन ( पेंशन ) योजना जाहीर करावी.
प्रतिमा जोशी यांच्या पोस्ट वरून साभार
@श्रमिक विश्व न्यूज