जगात जर्मनी अन भारतात परभणी !!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीची सर्वत्र चर्चा ...

धार रोडवरील रस्त्याच्या मध्यभागातील इलेक्ट्रीक पोल न काढता करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करून कठोर कार्यवाही करा तसेच रस्त्यावरील इलेक्ट्रीक पोल तात्काळ हटवा..

धार रोड वरील विद्युत खांब


प्रहार जनशक्ती पक्षाचा रस्ता रोको आंदोलनचा इशारा..

परभणी – शहरा लगत असलेल्या धार रोडवरील सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याला मागील चार वर्षापूर्वी सुरवात झाली होती. अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नसून या रस्त्याच्या कामामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच संबंधित अभियंत्याची अक्षम्य चुक झाली असून रस्त्याचे काम सुरू करण्या आगोदर रस्त्यावरील अतिक्रमणे व रस्त्यामध्ये येणारे सर्व अडथळे काढूनच काम करणे अपेक्षित होते व तसा बांधकाम विभागाचा नियम पण आहे परंतू शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधीत रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने व संबंधीत ठेकेदाराने रस्त्याच्या मध्यभागी असलेले तब्बल ३५ विद्युत खांब व दोन डि.पी. न हटवता रस्त्याचे कॉक्रेट काम पूर्ण केले त्यामुळे अकरा मीटर रुंदीचा दोन पदरी असलेला हा रस्ता रस्त्यामधील विद्युत खांब न काढल्यामुळे केवळ सहा मीटर चा राहीला आहे. विद्युत खांबाच्या आड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक बाधीत होत आहे. कोटयावधी रुपये खर्च करूनही रस्ते अर्धवट राहत असतील व रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने होत असेल तर तो शासकिय निधीचा अपव्यय आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे शिष्टमंडळ


संबंधीत रस्त्यावरील वाहतूक अडथळे ठरणारे सर्व ३५ विद्युत खांब व डि.पी. तात्काळ हटवून रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करावे तसेच रस्त्यावर डिव्हायडर टाकण्यात यावेत व संबंधीत प्रकरणामध्ये नियोजित रस्त्यावरील अडथळे न काढता रस्त्याचे काम करण्यास परवानगी देणाऱ्या तसेच चुकीच्या कामाचे बील काढणाऱ्या संबंधीत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता व उप विभागीय अभियंता यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कडे केली आहे. या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी कार्यकारी अभियंता श्री पाटील यांना चांगलेच धारेवर धरले.


धार रोड वरून प्रवास करणाऱ्या सटला, धार, समसापुर, दुर्डी, मांगणगाव, मटकऱ्हाळा, साडेगाव, संबर, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, जोड परळी व पिंगळी कोथळा इत्यादी गावातील नागरिकांना या सर्त्यावरून प्रवास करावा लागतो परंतु मागील चार वर्षापासून अर्धवट असलेल्या व मध्यभागी विद्युत खांब असल्याने या नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे. त्या मुळे संबंधित अभियंत्या वरील कार्यवाही सह संबंधीत ठेकेदाराने येळेत काम पूर्ण न करणे त्याच बरोबर रस्त्यावरील अडथळे न काढता रस्त्याचे कॉक्रीट पूर्ण करणे असे चुकीच्या पद्धतीने काम केल्याबद्दल चौकशी करून त्याला तात्काळ काळ्या यादीत टाकावे. येत्या आठ दिवसामध्ये वरील मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने गुरुवार दि. २६ मे २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी या कार्यालयाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने परिसरातील गावातील नागरीकासह धार रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . व आंदोलनाच्या वेळी उध्दभवणाऱ्या कायदा व सुव्यस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय स्वतः जबाबदार असेल असे हि या निवेदनात म्हंटले आहे.

धार रोड परभणी


निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, धर्मेंद्र तूपसमिंद्रे, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

@श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here