परभणी (दि.04) शहरातील साखला प्लॉट भागातील रहिवाशी असणाऱ्या कल्पना भारत मोरे या महिलेने दिनांक ०४ डिसेंबर पासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.पती भारत मारोतराव मोरे यांच्या मृत्यूस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांचा निष्काळजीपणा व चूका कारणीभूत ठरल्या असतांनासुध्दा संबंधितांविरोधात रुग्णालय प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मोरे कुटूंबियांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
एक महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटून सुद्धा उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर रूग्णालय प्रशासान कारवाई करत नसल्याचा मोरे कुंबियांनी निवेदनात नमूद करीत मुलांसह उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.महिलेचे पती 6 ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती उत्तम असतांनासुध्दा वैद्यकीय अधिकार्यांच्या केवळ निष्काळजीपणामुळे व बेफिकीरपणामुळे भारत मोरे यांची प्रकृती बिघडली आणि पुढील उपचार सुरु करण्यापूर्वीच मोरे यांचा मृत्यू झाला, असा आरोप श्रीमती कल्पना भारत मोरे यांनी केला असून या प्रकरणात उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आठवडा उलटून जिल्हा प्रशासनाकडून दखल नाही.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले निवेदन आठवडा होऊन उपोषणाची दखल घेण्यात आली नाही.प्रत्येक्षात उपोषण आंदोलनास सुरुवात झाल्यावर सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासनाकडून रूग्णालय प्रशासनाला पत्र देऊन त्याची एक प्रत उपोषणकर्त्यास देण्यात आली.
केस पेपर देण्यास ही विलंब.
भारत मोरे यांच्या उपचारार्थ दाखल असतानाचे केस पेपर तथा इतर कागदपत्रांची माहिती अधिकारात दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पत्नी कल्पना मोरे यांनी मागणी करून ही जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून केस पेपर देण्यास विलंब करण्यात आल्याचे यांनी सांगितले.