शासकीय रुग्णालयात कार्यरत असतांना डॉक्टरांना खाजगी सेवा करण्यास मनाई आहे, शासनाच्या वतीने व्यवसाय विरोधी भत्ता देऊन शासकीय रुग्णालयात कार्यरत असतांना पूर्ण वेळ रुग्ण सेवा देता यावी व आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. परंतु परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असतांना अनेक डॉक्टर सर्रास खाजगी रुग्णालय चालवतात त्याचा परिणाम असा होतो कि, शासकीय रुग्णालयात रुग्ण सेवेच्या वेळी डॉक्टर गैर-हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासन याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याने रुग्णांचे मात्र मोठे हाल होताना पहायला मिळतात..