परभणीत धार रोड कचरा डेपो प्रकरणी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात कचरा टाकून आंदोलन.

अनधिकृत कचरा डेपो प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक..

0
562

परभणी – मागील १४ वर्षा पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय अनधिकृतपणे सुरू असलेला धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपो तत्काळ बोरवंड खुर्द येथे स्थलांतरित करण्या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाने काही दिवसापूर्वी मा.जिल्हाधिकारी मॅडम, परभणी शहर महानगर पालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देऊन सबंधित अनधिकृत कचरा डेपो १५ दिवसाच्या आत बोरवंड खुर्द येथे स्थलांतरित करावा, परवानगी शिवाय अनधिकृत कचरा डेपो चालवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या परभणी शहर महानगर पालिका प्रशासन वर दंडात्मक कारवाई करावी व चिरीमिरी घेऊन अनधिकृत कचरा डेपोवर कार्यवाही न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदना द्वारे दिला होता.

या प्रकरणी मा.जिल्हाधिकारी मॅडम यांनी मा.आयुक्त परभणी शहर महानगर पालिका यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु कागदी घोडे नाचवण्या पलीकडे महानगर पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने काहीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनात व कार्यालयात सर्वत्र कचरा डेपो वरून आणलेला कचरा फेकला तसेच व कार्यालयाला कुलूप ठोकले.


अचानक झालेल्या या आंदोलना मुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला व कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्याने सर्वत्र घान व दुर्गंधी पसरली होती. या वेळी संतप्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही केली. आंदोलना नंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला एक निवेदन देऊन धार रोड वरील अनधिकृत कचरा डेपो तात्काळ स्थलांतरित करावा, परवानगी शिवाय अनधिकृत कचरा डेपो चालविणाऱ्या महानगर पालिका प्रशासन वर दंडात्मक कारवाई करावी तसेच चिरीमिरी घेऊन अनधिकृत कचरा डेपोवर कार्यवाही न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिला.


महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने १४ वर्षा पूर्वी म्हणजेच दि.०७/०६/२००७ रोजी परभणी तालुक्यातील गंगाखेड रोड वरील बोरवंड खुर्द येथे गट क्र २८ येथे कचरा डेपो व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी परवानगी दिलली आहे . यानंतर वेळोवेळी या परवान्याचे नुतणीकरण ही करण्यात आले. हे विशेष या अनधिकृत कचरा डेपो मुळे परभणी शहरातील नागरिकांचे व धार रोड वरून शहरात ये जा करणाऱ्या धार, मांगनगाव, साटला, दूर्डी, समासापुर, मटकराळा, सांवंगी, संबर व साडेगाव अश्या नऊ ते दहा गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

श्रमिक विश्व फोटो


आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे,तालुका प्रमुख बाळासाहेब तरवटे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, ओंकार खटिंग, रामेश्वर जाधव इत्यादींनी सहभाग घेतला.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here