जालना ते नांदेड या महामार्गासाठी राज्य शासनाकडून जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे; संपादित होणाऱ्या जमिनींना राज्य सरकारने योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत केली.
परभणी तालुक्यातील कुंभारी, दिग्रस, आर्वी, टाकळी, सनपुरी, करडगाव,धारणगाव, साटला, समसापुर,धार, दुरडी,मुरंबा,सांबा,नांदगाव, पांढरी, रहाटी, नांदगाव खुर्द असे एकूण 17 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण होणार आहे.त्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या गावातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. या मार्गासाठी आम्ही जमिनी द्यावयास तयार आहोत, परंतु जमिनीच्या अधिग्रहणानंतर जमिनीस योग्य तो भाव दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
श्रमिक विश्व न्यूज