परभणी विधानसभा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनिल आहिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल …

    जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवणार असल्याची ग्वाही.


    परभणी:(२९) परभणी विधानसभा मतदारसंघासाठी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल हरिश्चंद्र आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
    सामान्य कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन परिवर्तन महाशक्तीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

    उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने,उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव,तालुका प्रमुख उद्धव गरुड,शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस वैभव संघई,माऊली गरुड, माणिक गरुड, सुधीर देशमुख, शेख राजू, धाराबा कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    सचिन देशपांडे

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here