परभणी : गाडगेबाबा नगर झोपडपट्टी रहिवाश्यांचा जागा मालकी हक्कासाठी लढा …

संत गाडगेबाबा नगर बचाव कृती समितीचे धरणे.

परभणी : संत गाडगेबाबा नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे दिनांक 18 पासून बेमुदत धरणे आंदोलन.

गेल्या दोन वर्षापासून संत गाडगेबाबा नगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर ३०६/१/अ मधील ०४ एकर 12 गुंठे जमिनीवरील त्यांची झोपडपट्टीतील घरे नियमित करून त्यांना मालकी हक्क द्यावा म्हणून वेळोवेळी निवेदने दिली आहेत.

सलम अॅक्ट 1971 नुसार खाजगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टी नियमित करण्याची कायदेशीर तरतूद असूनही प्रशासन वरील बाबतीत कोणतीही दखल घेण्यास तयार नाही,तत्कालिन जिल्हाधिकारी पालकमंत्री यांना याबाबत वेळोवेळी निवेदने दिली असून तीन वेळा पालकमंत्र्यांनी सर्वांसमक्ष प्रशासनास सदर जमीन संपादित करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.परंतु प्रशासनाने आजतागायत साधे एकही लेखी उत्तर संत गाडगेबाबा नगर मधील रहिवाशांच्या नावे दिले नाही अशा प्रकारचे निवेदन संत गाडगेबाबा नगर झोपडपट्टीतील संत गाडगेबाबा नगर बचाव कृती समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर एड.माधुरी क्षीरसागर,गणपत गायकवाड,सचिन देशमुख चंदू शिंदे,उत्तम चव्हाण,कैलास कांबळे,प्रकाश गोरेकर,ज्ञानदेव म्हस्के अनिल मोरे,सर्जेराव सदर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here