परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे हेक्टरी ५० हजार रुपये शासकीय मदत जाहीर करा..
प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी..
परभणी – जिल्हयामध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: हैदोस घातला असुन शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असुन त्याचबरोबर कपाशी पिकाचेही मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे आधी अतिवृष्टी त्या नंतर पावसात खंड व आत्ता बसललेला परतीच्या पावसाचा तडाखा त्या मुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.अनेक ठिकाणी शेतक-यांनी काढणी करुन शेतामध्ये ठेवलेल्या सोयाबीन पिकाच्या वळया वाहुन गेल्या काही ठिकाणी सोयाबीन शेंगांना कोंब फुटलेली आहेत तर कपाशीचे पिक आडवे झाले आहे.
जिल्हयामध्ये मोठया प्रमाणावर झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करुन राज्य शासनाने यापूर्वी दुष्काळाचे जाहीर केलेली हेक्टरी १३६०० रु. शेतक-यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यात यावे तसेच परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल शेतक-यांना हेक्टरी ५०,०००/- रुपये आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर करावी याबाबत राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा या मागणी साठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी पक्षाच्या वाटीने प्रशासनास कोंब फुटलेले सोयाबीन धान देण्यात आले.
जिल्ह्यात प्रजान्यमान यंत्र बंद असल्यामुळे जिल्हा प्रशासन पावसाची आकडेवारी चुकीची जाहीर कारते त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्य शासनाने याअगोदर जाहीर केलेल्या १३५००/- रुपये हेक्टरी दुष्काळी अनुदान अद्यापही शेतक-यांच्या खात्यावरती जमा करा, परतीच्या पावसाचे तात्काळ पंचनामे करुन विमा कंपन्यांना नुकसानीचे माहीती देण्यात यावी तसेच जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना ५०,०००/- रुपये हेक्टरी मदत राज्य शासनाने द्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख, गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, सय्यद युनूस इत्यादिंच्या सह्या आहेत.
श्रमिक विश्व न्यूज