परभणी – परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर मॅडम यांनी महानगर पालिका सभेत अनेकदा मंजूर झालेल्या परंतु प्रत्येक्षात अमलात न आलेल्या ठरावा वर कार्यवाही करायला सुरुवात केली असून परभणी शहरातील मुख्यरस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्याचा तसेच शहरात जड व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे व परभणी शहर बॅनर मुक्त करण्याच्या महानगर पालिकेच्या दोन वर्षांपूर्वी बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या या दोन्ही निर्णयांवर प्रत्येक्ष अंमलबजावणी चा निर्णय घेतला आहे. परभणी जनतेच्या हिताचे असलेल्या या दोन्ही निर्णयांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून धाडसी निर्णया बद्दल महानगर पालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
आज दि. ०७ एप्रिल २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या संपर्क कार्यालयात पक्षाच्या जिल्हा कर्यकरणीची बैठक घेण्यात आली या बैठकीत महानगर पालिका आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून शहरामध्ये दोन चाकी वाहन चालवणे तर सोडाच नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत असे असताना हि आज पर्यंत महानगर पालिका प्रशासनाने वाहतुकीच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष दिले नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे बाबत व परभणी शहर बॅनर मुक्त करणे बाबत दोन वर्षापूर्वी महानगर पालिका सभेत याबाबत ठराव पास झाले परंतु त्यावर अंमबजावणी झाली नाही त्यामुळे परभणी शहरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते तसेच शहर विविध पक्ष व संघटनेच्या बॅनर मुळे विदुपू झाले होते.
आजवर महानगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून शहरातील वाहतूक व्यवस्थे बाबत बैठकीत ठराव मंजूर होऊन ही याबाबत काहीच कार्यवाही केली नव्हती परंतु आयुक्तांच्या पुढाकारामुळे शहरातील वाहतुकीस शिस्त लागून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या निर्णयाचा जनतेला काही दिवस त्रास होईल पण वाहतुकी बाबत शिस्त असणे आवश्यक आहे असे ही या प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, मिडिया प्रभारी नकुल होगे, रामेश्वर पुरी, पिंटू कदम, ॲड सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, शेख बशीर, बाळा नरवाडे, सय्यद युनूस इत्यादी उपस्थित होते.
श्रमिक विश्व न्युज