परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेशा नंतर ही विलंबाचे ग्रहण !

आश्वासनांचा मोसम येणार आहे,पण गत काळातील समस्यांचे काय झाले ?

जेल कॉर्नर ते आपना मार्ग रस्ता
जेल कॉर्नर ते आपना मार्ग रस्ता

परभणी : (दि.०८) देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या वतीने जागा वाटपाचे खलबत्ते सुरू असल्याच्या बातम्या धडकू लागल्या आहेत.प्रशासकीय पातळीवर ही निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बैठकांचे आयोजन होत असून,हळू हळू निवडणुकांचा रंग भरायला सुरुवात झाली आहे.

जनतेच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडण्याचे औचित्य काय असते ?

लोकसभेसाठी जिल्ह्याचा खासदार निवडून देशाच्या सर्वच्च सभागृहात आपला प्रतिनिधी पाठवून विभागातील विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील, शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने तथा जिल्ह्याच्या विकासाच्या व्हिजन बाबत ठोस प्रयत्न व्हावेत अशी सर्वसामान्य पणे कुठल्याही मतदार असलेल्या जनतेची अपेक्षा असते.संपूर्ण व्यवस्था तशी फ्रेम करण्यात आलेली आहे.

 

पण परभणी जिल्ह्याची प्रत्येक्षात काय अवस्था आहे !

रोजगाराच्या शोधात जिल्हाभरातून इतरत्र स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.त्याचे मूळ कारण आहे मागच्या तिस वर्षात या भागात कोणताच मोठा प्रोजेक्ट स्थापन करण्यासाठी विशेष काही प्रयत्न झालेले नाहीयेत.जिल्ह्याला लोहमार्ग या सह कृषी विद्यापीठ असून तथा सुपीक जमीन लाभलेली असताना मात्र जिल्ह्यात म्हणावे तसे शेती पूरक प्रक्रिया करणारे उद्योग येऊ शकलेले नाहीयेत.उद्योगाची उभारणी जशी खुंटली तशीच पायाभूत सुविधांची वर्षानुवर्षे असलेली वणवा ही प्रमुख बाब या जिल्ह्याला शाप आहे.परभणी जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची कामे प्रत्येक्षात पूर्ण व्हायला अनेक वर्षी लागली तशीच त्यांच्या गुणवत्ता बाबत ही थेट लोकसभे पर्यंत आवाज उठवावा लागण्याचे दिसून आले,येवढे होऊन ही काही प्रमुख रस्ते पाच सात वर्षात ही पूर्णत्वास जाऊ शकलेले नाहीयेत.ही शोकांतिका आहे.

अंतर्गत रस्त्यांच्या समस्या उग्र रूप धारण करून आहेत.

परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामावरील अनेक वर्षातील घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यात परभणीकरांची होत आलेली फरफट आता सर्वज्ञात आहे.अशी मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जनतेची अत्यंत क्रूर थट्टा इतरत्र कुठेही कधी झाली नसेल ! शहरातील काही रस्ते तर अक्षरशः दहा ते पंधरा वर्षांपासून बकाल स्वरूप धारण करून ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून कडीचेही काम करण्यात आलेलं नाहीये.त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागला आहे.

कार्यारंभ आदेश निघाले पण कामे होत नाहीत !

जिल्ह्यातील प्रशासनावर मजबूत पकड असलेला एकही पुढारी नसल्याचे हे घोतक आहे.बहु विलंबाने व्यवस्था करत असलेलं काम सुरुवात करण्यात अनेक वर्षांचा कालावधी घेतला जातो आणि त्याचा जाब विचारण्यासाठी कोण नाहीये असे एकंदरीत चित्र आहे.चार वर्षांपासून मान्यता मिळून परभणी शहरातील लोहगाव रोड या भागातील रस्त्यांची कामे आज रोजी पर्यंत ही सुरू करण्यात आलेली नाहीयेत.गुत्तेदार राज काय असते याचे हे उदाहरण आहे.

श्रमिक विश्व 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here