परभणी : ( २५ ) शहर व तालुका लोकसंख्या जवळपास 6 लाख असुन मोठे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. परभणी शहरा मध्ये सर्व तलाठी अनाधिकृत कार्यालयातुनच कारभार बिनधास्त चालु असुन शहराच्या मध्यवती भागात राज्य शासनाने मोठे तलाठी भवन देखील उभारले आहे .परभणी शहर तलाठी सदरील ठिकाणी कधीही उपलब्ध राहत नाहीत.अनाधिकृत कार्यालयात आवक जावक कोणती व्यवस्था कार्यालयात नाही. शासकीय फीस अकृषी कर याचा कोणताही फलक कार्यालयामध्ये उपलब्ध नाही नेमका याच गोष्टीचा फायदा काही भ्रष्ट तलाठी घेत असुन मनमानी पद्धतीने अकुषी कर भरण्यास तोंडी सांगितले जात आहे.अकुषी कर भरल्याची पावती देखील दिली जात नाही .अकुषी फेरफार कित्येक वेळा न भरता पण फेरफार केला जातो.सर्व शासकीय कामे खाजगी अनाधिकृत व्यक्ती करत आहेत.अनधिकुत कार्यालयाची किंवा अनाधिकृत व्यक्तीची कुठल्याही प्रकारची परवानगी परभणी शहर तलाठी ने घेतली नाही हे नमूद करत ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने परभणी शहरातील देशमुख हॉटेल लगत शहर तलाठी यांच्या अनाधिकृत कार्यालयासमोर जोरदार निरदर्शने करून परभणी तहसीलदारांना निवेदन सुपूर्द केले.

श्रमिक विश्व फोटो

अकुषी प्लाट संदर्भात एक महिन्यात निर्णय देण्याची जबाबदारी जरी निश्चित असली तरी प्रत्यक्षात लाच दिल्याशिवाय तीन चार महिने कामे होत नाहीत. प्रत्येक सज्ज्या चा हस्त लिखित 7/12 वर असलेली नोंद ऑन लाईन करतेवेळी शासकीय चुकी मुळे आँनलाईन वर आली नाही.सदरील चुक दुरुस्त करण्यासाठी काही भ्रष्ट तलाठी मंडळ अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाचेची मागणी करत आहे. भ्रष्ट कारभाराचे लागेबांधे परभणी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील सामिल आहेत.तरी सदरील सर्व तलाठ्यास आदेश देऊन संपूर्ण अहवाल करुन तहसील दार मार्फत आदेश देऊन आँनलाईन 7 /12 वर नोंद घेऊन लोकांचा त्रास कमी होईल, शासकीय चूक असून प्रत्येक खातेदारा चां अर्ज येण्याची वाट पाहून खुप मोठ्या कळ्या बाजारीस आळा बसवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

बहुतांश जणांना जाणिवपूर्वक आवक जावक शिक्का दिला जात नाही म्हणुन कामाची जबाबदारी ठराविक वेळेची येत नाही. कोणतीही आदरयुक्त भीती जिल्हा प्रशासनाची उरली नाही अनागोंदी व मनमानी कारभार असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने किंवा दलाला मार्फत लाच देऊन नाईलाजाने शासकीय कामे केली जातात. बाबत मागण्याचे निवेदन परभणी जिल्हा प्रशासनाला देऊनही काही कारवाई झाली नसल्याने दि.२५ जानेवारी २०२२ रोजी तलाठी कार्यालयासमोर तीव्र निर्दशने करण्यात आली.

ऑल इंडिया युथ फेडरेशन कडून देण्यात आलेल्या निवेदनात ऐकून १७ प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत,त्यात

परभणी शहरांसाठी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार तलाठी नियुक्त करा.
.प्रत्येक फाईल आवक जावक नोंद करा .अर्जदारास पोहोच दया.

  1. खाजगी अनाधिकृत तलाठी कार्यालय बंद करा.दलाल मुक्त कार्यालय करा.
  2. अकृषी कर ई.फिस बाबत फलक कार्यालयात लावा.अकुषी कर भरल्याची रितसर पावती द्या.
  3. महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या तलाठी भवनामध्ये कार्यालय अधिकृत सुरू करा व अनागोंदी व गैरकारभार तात्काळ बंद करा .
  4. अकृषिक कर भरून न घेता फेरफार करणाऱ्या तलाठ्यावर कडक कारवाई करा.
  5. शासन नियमाप्रमाणे वेळेत अकृषी प्लॉट फेरफार न करणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करा.
  6. अकृषिक प्लॉट फेरफार शासन नियमाप्रमाणे वेळेत निकाली न काढणाऱ्या तलाठी व तहसीलदार यांच्यावर कारवाई करा.

खाजगी मदतनीस ठेवल्यास जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालय मधुन लेखी परवानगी असणे बंधनकारक करा.

खाजगी मदतनिसाच्या अनागोंदी गैरकारभार व बेकायदेशीर कृत्या करिता तलाठी जबाबदार निश्चित करा.

  1. निवेदनावर संदिप सोळुके ,अँड. लक्ष्मण काळे, सय्यद अझहर, मोसीन शेख, सुनिल ससाणे, प्रसाद गोरे, सतीश मस्के, खैसर शेख, मनोज शेळके,मोरे,शेख असद,महिप रेवणवार, गंगाधर यादव ईतर अखिल भारतीय युवा फेडरेशन परभणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here