पूर्णा शहरात भटके विमुक्त समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार …

कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड वाटप.

https://youtu.be/WzHnlUkqYHM?si=trRrkXMxGg0QXRVg

पूर्णा ( दि.११) शहरातील क्रांती नगर परिसरात वास्तव्यास असलेले भटके विमुक्त पारधी जमातीचे लोक जे पूर्णा शहरात मागील अनेक वर्षापासून पालात राहतात त्यांच्या कडे स्वतः ची ओळख सांगणारे असे कुठलेच कागदपत्र नव्हते त्यामुळे ती कुटुंब शासनाच्या विविध योजनांमधून तर वंचित होतेच शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पण निर्माण झाला होता अश्या परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याला प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या पुढाकाराने या सर्व कुटुंबाला त्यांचे मतदान कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड तयार करण्यात आले.

भटके विमुक्त जाती जमाती घटक
भटके विमुक्त जाती जमाती घटक

भटक्या विमुक्तांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे मूलभूत हक्क अधिकार मिळायला पाहिजे होते, ते त्यांना कागदपत्राअभावी मिळत नव्हते, म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्ताना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी काम करत असताना, पहिल्यांदा भटक्या विमुक्तांचे मतदार यादी मध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला, त्यांना मतदार ओळखपत्र मिळताच त्या आधारे त्यांचे आधार कार्ड तयार करण्यात आले, आधार कार्ड बनताच त्यांचे रेशन कार्ड बनविण्यात आले, हे सर्व शासकीय सोयी सुविधा घेण्यासाठी उपयुक्त असलेले आधारकार्ड, मतदानकार्ड व रेशनकार्ड भटक्या विमुक्तांना वाटप आज दि. ११ मार्च २४ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शिवाय भटक्या विमुक्तांना आनंदाचा शिधा प्रत्येकी कुटुंबाला एक किट देण्यात आली विशेष म्हणजे हा कार्यक्रम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पालावर जाऊन घेण्यात आला.

या वेळी तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के पिंपरनकर, शहर प्रमुख संजय वाघमारे, क्रांतीनगर शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनीर, अली नगर शाखाप्रमुख अय्यूब शब्बीर शाहा, सलीम सिकंदर शहा, मुनीर सय्यद शब्बीर, पारधी जमातीचे धर्मा भोसले, रेणुका पवार, गंगाबाई पवार, शंकाई पवार, शेषकला भोसले व सर्व प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here