संजीव चांदोरकर
ड्राय फ्रुट्स (सुका मेवा ) आणि मानवी शरीर सुदृढ बनणे.
कोरोनाने अर्थव्यवस्थेत जो हाहाकार उडवला आहे त्याची सर्वात जास्त झळ कोट्यवधी सूक्ष्म / लहान उद्योग , स्वयंरोजगाराना बसली आहे.
मागच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली पॅकेजेसची दिशा बघता , यावर्षी देखील बँकांना / मायक्रो क्रेडिट देणाऱ्या वित्तसंस्थांना “आवाहन” केले जाईल कि,
सूक्ष्म / लहान / स्वयंरोजगारना कर्जे द्या , मुद्रा सारखी अजून एक योजना जाहीर केली जाईल ;
त्यातून नक्की किती लोकांना खरोखर फायदा झाला , किती उद्योग पुन्हा एकदा वधारले याची खरी आकडेवारी कधी माहित होत नसते
पण उद्योगांसाठी कर्जे हि ड्राय फ्रुट्स सारखी असतात ; ड्राय फ्रुट्स (सुका मेवा ) पौष्टिक आहार आहे आणि खाल्यामुळे मानवी शरीर सुदृढ बनते ; मान्य
ज्याची पचनशक्ती आधीच कमकुवत आहे किंवा झाली आहे त्याला सुका मेवा खायला दिला त्याला ढाळ लागेल ;
त्याचा अधिकच शक्तिपात होईल आणि तो कमकुवत होईल ; ड्रायफ्रूट देण्याचा जो उद्देश त्याच्या उलटे परिणाम होतील
दुसऱ्या शब्दात ड्राय फ्रुट्स त्यालाच आणि तेव्हाच दिली पाहिजेत ज्याची पचन शक्ती आणि तब्येत किमान एका पातळीवर आहे
उद्योगांच्या कर्जाच्या पचनशक्तीला वित्तीय परिभाषेत “क्रेडिट ऍबसॉरप्शन कपॅसिटी” असेच म्हणतात ; म्हणजे कर्ज घेणारा कर्जे पचवून , त्यातून वित्तीय ताकद कमवून , घेतलेली कर्जे फेडू शकतो का ?
प्रत्यक्षात सूक्ष्म, लघु उद्योजकांना कर्जे , लिक्विडीटी हवी आहे पण त्यापेक्षा बरेच काही हवे आहे ; त्याला “क्रेडिट प्लस” ऍप्रोच म्हणतात
कोट्यवधि व्यक्तींना / कुटुंबाना / उद्योगांना कर्जाव्यतिरिक्त अनेक एक्सटेंशन सेवांची गरज आहे ; पण ना त्यासाठी योजना , ना यंत्रणा ना त्याची सार्वजनिक चर्चा होतेय
कर्जे कोणाला , कधी द्यायची याचा वित्तीय वा आर्थिक ज्ञानाशी काही संबंध नाही ; सर्वात आधी येतो बौद्धिक प्रामाणिकपणा
संजीव चांदोरकर.