अकोला : टिप्पर उलटून झालेल्या भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू झाला.ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव फाट्याजवळ घडली.अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व मृत्य 19 ते 31 या वयोगटातील असून ते मध्य प्रदेशातील आहेत.ते समृद्धी महामार्गाच्या बांधकामावर काम करीत होते.
सिंदखेड राजा-मेहकर महामार्गावरील बीड येथून सळ्या घेऊन टिप्पर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील तळावर जात होता.टिप्पर मध्ये समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर होते तडेगाव नजीक अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटले जमिनीवर पडलेल्या मजुरांच्या अंगावर लोखंडी सळ्या आणि टिप्पर कोसळल्याने त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी दिली.जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व मृत्यू १९ ते ३१ या वयातील आहे.संततधार पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मजुरांच्या अंगावरील सळ्या बाजूला करून त्यांना बाहेर काढण्यात आले.
गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले तर काहींना सिंदखेड राजा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मृत आणि जखमी मजूर मध्यप्रदेशातील आहेत.जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली.
गंभीर जखमींना जालना येथे हलविण्यात आले आहे. मृत मजुरांची उत्तरीय तपासणी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आतच करण्यात आली.
श्रमिक विश्व न्युज