परभणी : गोदावरी खोऱ्यातील पुराने बाधित गावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात व पूरग्रस्त लागवड क्षेत्रे अतिवृष्टी दाखवण्याचा प्रशासन प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे,त्याच धर्तीवर गोदावरी नदी बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी नदीच्या सर्व पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वतीने भाकपचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांनी दिला आहे.
गोदावरी व उपनद्या यांच्या पूराची अवस्था ८ दिवसांनी देखील कायम आहे.बोरणा या गोदावरी च्या उपनदी असलेल्या भिसेगाव ता सोनपेठ येथील ठिकाणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भेट दिली आणि अतिवृष्टी चे पंचनामे करण्याचे आदेश दिले,पंचनामा करण्यासाठी नमुने दिले आहेत प्रत्यक्षात पूर परिस्थितीची नोंदच केली जात नाही.
मुळात हा पूर आहे कि अतिवृष्टी…? असा प्रश्न कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री उत्तर देतील काय..?
पंचनामेच सदोष आहेत केवळ शब्दांचा खेळ करण्यात येत आहेत,अश्या प्रकारे आरोप करून पुढे मराठवाड्याच्या पूरग्रस्तांशी भेदभाव अन्याय कारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पूरात हेक्टरी रु ४० हजार आणि मराठवाड्यात मात्र केवळ रु ६ हजार ८००,असा भेद शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याने २७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील प्रत्येक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
श्रमिक विश्व न्यूज