परभणी : (१९) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखडायामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३२०७ ए एन एम ची पदे मंजुरी करिता केंद्र शासनास प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडायामध्ये त्यातील ५९७ मंजुरी व वेतन देण्यात आलेले नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील ए एन एम चे ५९७ पदे रद्द करण्याचे पत्र सहसंचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या स्वाक्षरीने दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्रात कार्यरत ५९७ ए एन एम यांच्या सेवा समाप्त आलेल्या आदेशात मागील ०१ वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील ए एन एम पदे,ज्या ए एन एमचे काम असमाधानकारक असेल,ज्या ए एन एम च्या सेवा कमी झालेल्या आहेत यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अभियान अंतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्रात कार्यरत ५९७ ए एन एम यांच्या सेवा समाप्त करण्याची कार्यवाही ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील मंजुरी करिता प्रस्तावित करण्यात आलेल्या ए एन एम यांची संख्या १०१,तर मंजुरी प्राप्त झालेल्या नुसार ८२ एवढी आहे.१९ ए एन एम यांच्या सेवा समाप्त करण्यात येणार आहेत.
श्रमिक विश्व न्यूज