परभणी :(दि .३० ऑगस्ट) शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या एजन्सी मध्ये बदल करून पुनश्च काम सुरू करून ही संपूर्ण रुग्णालय आवारात होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे आगीच्या घटना टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत आहे.रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी तसेच वित्त आणि जीवितहानी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सर्व रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉकड्रिल घेण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत.सदर आदेशानुसार परभणी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयात या आदेशाचा विसर पडला आहे का ? प्रत्येक्ष अंमलबजावणी बाबत स्थितीची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षात मुंबई,नाशिक सह शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.भंडारा जिल्हा रुग्णालयला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील फायर ऑडीट साठी सरकारने एक समिती स्थापन करून भंडारा जिल्ह्यातील नवजात बालक केयर युनिट आग लागण्याची घटना तथा विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात आणि अहमदनगर मध्ये रुग्णालयातील आगीच्या घटनांच्या नंतर फायर ऑडीट बाबत व उपाययोजनाबाबत संपूर्ण राज्यभरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण तथा इतर उपाययोजनांच्या बाबत आगीच्या घटना टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परभणी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात उल्लंघन होत असून,रुगणालाय परिसरात सोमवार ते शनिवार बाहय विभाग सुरु असतानाच्या वेळात संपूर्ण रुग्णालयात रुग्ण तथा रुगणांच्या नातेवाईकांच्या दुचाकी वाहनासह चारचाकी वाहने आणि इतर ऑटो,प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्या खाजगी अम्ब्युलन्स अश्या वाहनांची प्रचंड वर्दळ निर्माण होत आहे.
मागच्या १५ नोव्हेम्बर २०२१ या माहिनायपासून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेस्को सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या गार्डची नेमणूक बंद करण्यात आली. त्यानंतर काही काळ एका पुणे स्थित सुरक्षा एजन्सी कडे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय प्रशासनाने सुरक्षेचा कार्यभाग सोपवला होता.सद्या शासनाच्या वतीने एक सुरक्षा एजंशी नेमण्यात आली आहे,सद्य स्थितीत सदर सुरक्षा रक्षक यंत्रणा कार्यरत असून रूग्णालय परिसरात वाहतूक कोंडी व वाहनांच्या शिस्ती बाबत काडीचा फरक पडलेला नाहीये.
रूग्णालय परिसरात अस्तव्यस्थ वाहनांच्या समश्येंने उच्चांक गाठला आहे.परिणामी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आग रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील वार्डाच्या बाहेर पडण्यासाठी दरवाज्या समोर अडगळ नको,परिसर मोकळा असणे आवश्यक असल्याचा बाबींचे स्पष्ट पणे उल्लंघन होते आहे.परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिसरात वाहनांच्या कोंडीची दखल घेऊन सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने सूचना पारित करून परिसर मोकळा राहील याची दक्षता रूग्णालय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.
श्रमिक विश्व