शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन धान्य बंदच्या शासन निर्णयाविरुद्ध अन्न अधिकार मोर्चा.

परिणामी अनेक एफसीआय गोदामांना टाळे लावण्यात आले आहे

परभणी : केंद्र सरकारने रेशन पुरवठ्यावरील तरतुदीमध्ये 97 हजार कोटी रुपयांची कपात केली आहे.त्यामुळे रेशन साठी लागणाऱ्या गहू व तांदूळ या अन्नधान्याची केंद्र शासनाच्या अन्न महामंडळाद्वारे संपूर्ण खरेदी गतवर्षीपासून बंद केली आहे.

परिणामी अनेक एफसीआय गोदामांना टाळे लावण्यात आले आहेपरभणी येथील एफसीआय डेपो बंद करण्यात आला आहेत्या पाठोपाठ शिंदेफडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारने दि २८ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून परभणीसह १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशनवरील धान्य पुरवठा बंद केला आहेत्याऐवजी रोख रु १५० रक्कम रेशन कार्ड धारकास अदा करण्यात येत असल्याची घोषणा केलीतथापि गेल्या दोन महिन्यात कोणतेही धान्य रेशन पुरवठ्यातून शेंदरी कार्ड धारकास अदा करण्यात आलेले नाहीअशाच प्रकारची रोख रक्कम(डीबीटीदेण्याच्या अनेक योजना केंद्र व राज्य शासनाने रचल्या आहेत भविष्यात खतवीज पुरवठाइत्यादी क्षेत्रात लागू करण्याचा शासनाचा इरादा आहे.

याचा मोठा फटका गोरगरिबांना बसत आहे महाराष्ट्र सरकारने शासन निर्णयाद्वारे आठ लाख कार्ड धारकांचा व ३३ लाख लोकांचे रेशन दुकानातून धान्य वितरण बंद केले असून येथील धान्य महामंडळाचा गोदामाला कायमची टाळे ठोकण्यात आले आहे धान्य देण्याऐवजी लाभार्थ्यांना दीडशे रुपये रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

रेशन बचाव समिती व किसान सभेने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी विविध प्रश्नांसाठी मोर्चा काढला.शासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य पुरवठा बंद करून लाभार्थ्यांना रोख रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचा विरोधात आंदोलकांकडून मोर्चा काढून निषेध नोंद देण्यात आला.यावेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या सह कॉ ओंकार पवारकॉ शेख अब्दुल कॉ शिवाजी कदम(किसान सभानारायण वाघमारे रियाजखानसुभाष यादवअसिफोद्दिन काझीप्रदीप दमकोंडेशेख हकीमयांनी पुढाकार घेतला.

श्रमिक विश्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here