
परभणी : (दि.5) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परीसरात मागील अनेक महिन्यांपासून गौण खनिज उत्खनन सुरू होते.या उत्खनामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले जात आहे,शिवाय येथील पाण्याचे स्त्रोत देखील मोठ्या प्रमाणात बदल होत ह्रास होण्याची शक्यता ; भविष्यात उद्भवेल.
याबाबत जय किसान आंदोलन व विविध शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विद्यापीठ कुलगुरू व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत उत्खनन बंद करण्याची मागणी करण्यात आल्याने येथील गौण खनिज उत्खनन बंद करण्यात आले आहे.मुळामध्ये कृषी विद्यापीठात 30 एक फुटाला जर पाणी लागत असेल तर विद्यापीठ प्रशासनाला अशा शेततळ्याची काय गरज होती .
याबाबत उत्खननासाठी कुठल्या संशोधनाच्या नावाने त्यांनी जिल्हा प्रशासनाला परवानगी दिली हा प्रश्न आहे.
सुप्रीम कोर्टाने ही मागील दोन दिवसा खली हैदराबाद युनिव्हर्सिटी लगतचा वृक्षतोडीचा विषय ; त्यावर रोख लगावलेली आहे.परभणी कृषी विद्यापीठात ही याच पद्धतीमध्ये वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास हा हिरावून घेण्यात आला आहे.
