पण कॉर्पोरेटना दिल्या जाणाऱ्या अर्थसाह्याला “व्हायबिलिटी गॅप फंडिंग” म्हटले जाते ; ज्याला काही दशकांपूर्वी पूर्वी कॅपिटल सबसिडी म्हटले जायचे ; पण सबसिडी शब्द बदनाम करायचा होता म्हणून ते बदलले
गरिबांना स्वतःची आर्थिक पातळी उंचावण्यासाठीच्या कल्याणकारी योजना सरकारी तिजोरीवर ओझे म्ह्णून हिणवायचे
पण कॉर्पोरेट दिलेले टॅक्स हॉलिडे / करात सवलती हे सरकारचे कर्तव्य आहे असे प्रेझेंट करायचे
(लक्षात घ्या सरकारचा खर्च वाढणे आणि सरकारचे उत्पन्न कमी होणे याचा इम्पॅक्ट एकच असतो )
गरिबांचे / शेतकऱ्यांना कर्ज देता आले नाही तर त्याला थकलेली कर्जे म्हणतात ; आणि मग शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते
तर कॉर्पोरेटना कर्जे फेडता आली नाहीत तर त्यांना “नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स” म्हणतात ; कॉर्पोरेट ना मात्र कर्जमाफी नाही बेलआऊट पॅकेज दिले जाते
कोणत्याही प्रकारच्या, सामाजिक , आर्थिक , लैंगिक असमान / शोषक समाजाचा अभ्यास करायचा असेल तर
तत्कालीन भाषेवर / उपयोगात आणल्या जाणाऱ्या शब्दप्रयोगांवर / भाषेच्या टांकसाळीत पाडल्या जाणाऱ्या नवनवीन संकल्पनांवर लक्ष द्या
शोषक वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या शोषण करू शकत असतात कारण शोषितांना डीस-आर्म करण्याचे काम सातत्याने केले जाते / बळाचा वापर वेळ पडली तर होतो , मान्य. पण ती वेळ येणार नाही अशीच व्यूहरचना असते
सर्वात महत्वाचे असते शोषितांच्या मेंदूवर / विचार करण्याच्या पद्धतीवर प्रभुत्व मिळवणे ; आणि त्याची सूक्ष्म हत्यारे असतात शब्द / टर्म्स / संकल्पना
सध्याच्या जागतिक कॉर्पोरेट वित्त / भांडवल युगात तर हे प्राचीन तंत्र पराकोटीचे सोफिस्टिकेटेड केले गेले आहे ; याचा सर्वात जास्त पडताळा श्रीमंत / कॉर्पोरेट आणि गरीब वर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी योजनांमध्ये दिसतो
अतिशय भारदस्त शब्द योजना / मॅथेमॅटिकल वेस्टनात पॅकेज करून बघणाऱ्याचे / ऐकणाऱ्याचे डोळे / कान दिपवायचे इतके कि ऐकणाऱ्याला प्रचंड न्यूनगंड आला पाहिजे
लक्षात घ्या या टर्म्स / संकल्पना माणसांनी कॉईन केल्या आहेत ; कोण असतात हि माणसे , ती काही छापा काटा खेळत कशाला काय म्हणायचे हे ठरवत नाहीत , हे नक्की ! मग काय अजेंडा असतो त्यांचा
बौद्धिक प्रामाणिकपणा असेल तर वरच्या सारखी यादी काढा ; यादी खूप मोठी आहे
आणि विचार करा एकाच आर्थिक / वित्तीय फिनॉमिनॉनला वेगवेगळी परिभाषा तयार करण्याचे प्रयोजन काय असेल
डावी / उजवी लेबले नंतर लावा , तुम्हाला अधिकार आहे ; पण बौद्धिक प्रामाणिकपणा केंद्रस्थानी असला पाहिजे ; बौद्धिक प्रामाणिकपणाला डावी उजवी बाजू नाहीये.
संजीव चांदोरकर