मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात आता मोफत उपचार मिळणार आहेत. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे.
राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचा फायदा गरीब, गरजू रुग्णांना मिळणार असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
श्रमिक विश्व