कोरोना काळात हात कसे स्वच्छ ठेवायचे ; दिवसातून किती वेळा धुवायचे याची पोस्टर्स , जाहिरातीच्या मोहिमा उघडणारी सिस्टीम
प्रत्येक कुटुंबाला दिवसाला सरकारी नॉर्म्स प्रमाणे जे किमान पाणी लागते ते पुरवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षानंतर एकही मोहीम उघडत नाही
आयोडीन असलेल्या मिठाचे फायदे , विशेषतः वाढत्या वयातील मुलांच्या पोटात गेले पाहिजे म्हणून रंगीत प्रचार मोहीम करणारी सिस्टीम
कुटुंबाच्या आणि त्या मुलांच्या पोटात दोन वेळचे पोटभर जेवण कसे जाईल या प्रश्नाला भिडत नाही
चोवीस तास आरोग्य विम्याचे फायदे सांगून , दारोदार विमा एजंट पाठवून जास्तीतजास्त नागरिकांना आरोग्य विमा उतरवण्यासाठी उतावीळ झालेली सिस्टीम
आरोग्य सेवांचे भाव काही पटींनी वाढल्यामुळे एका फटक्यात विम्याचे तुटपुंजे कव्हर संपतंय हे माहित असून आरोग्य सेवांच्या भावांवर काहीच नियंत्रण ठेवत नाही ufabet เว็บตรง
पंतप्रधान जनधन योजने द्वारे ४३ कोटी बँक अकाउंट उघडले अशी जाहिरात करणारी सिस्टीम
त्या ४३ कोटी अकाउंट मध्ये गेल्या ७ वर्षात सरासरी फक्त ३५०० रुपयांच्या बचती (म्हणजे वर्षाला फक्त ५००) साठल्या आहेत आणि त्याचा संबंध कोट्यवधी नागरिकांना मासिक उत्पन्न मिळत नाही याच्याशी आहे हे मान्य करत नाही
तुम्ही अशा अनेक योजना / संकल्पनाची यादी करू शकता ;
उगाच नेहमीची टीका करू नका ; बाकी काही नाही तरी स्वतःच्या बुद्धीशी प्रामाणिक राहा
सगळ्यांचे उद्देश चांगलेच आहेत कोण नाकारेल ; पण ती योजना / संकल्पना लॉजिकल कन्क्ल्युजन कडे जात नाही हे काय त्या प्रवर्तकांना कळत नाही
संजीव चांदोरकर
श्रमिक विश्व न्यूज