परभणी : दि.(१६) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जागृक नागरिक आघाडीच्या वतीने परभणीचे पालक मंत्री नवाब मलिक यांना 16 रोजी निवेदन देण्यात आले.
परभणी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत देण्यात आलेल्या निवेदनामध्ये परभणी जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ मंजूर करावे.परभणी जिल्ह्यातील कोविड लसीकरण अंतर्गत महिलांसाठी आठवड्यातून एक दिवस लसीकरण मोहीम राबवावी. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्ग,राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण करून वाहतुकीस उपलब्ध करून द्यावे.परभणी महापालिका तर्फे पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध असूनही सर्वसामान्य परभणी शहर वासियांना पंधरा दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळते तरी आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्यात यावा.
परभणी महानगरपालिका अंतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करावी. परभणी महापालिका अंतर्गत ऑटो रिक्षा थांबे,पार्किंग झोन्स यांची आखणी करून देण्यात यावी.परभणी शहरातील नाना-नानी पार्क चे काम गेल्या चार वर्षापासून रेंगाळलेले असून ते त्वरित पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून करून देण्यात यावे.परभणी शहरात अंत्यविधीसाठी गॅस दाहिनी मंजूर करून देण्यात यावी. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या समोरील चौकात हायमास्ट लाईट बसवावा व चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे.
परभणी शहरातील अनेक कॉलनीमधील स्ट्रीट लाईट बंद आहेत ते त्वरित सुरू करण्यात यावेत परभणी शहरात 85 नोटिफाइड स्लम एरिया आहेत तर अनेक नोटिफाइड नसलेल्या झोपडपट्ट्या आहेत. परभणी शहरासाठी स्लम रेग्युलेटरी अथोरिटी स्थापित करून त्यास स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
कोविड काळातील सर्व प्रकारच्या शाळांच्या शैक्षणिक फिस मध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याच्या अंमलबजावणी योग्य यंत्रणेमार्फत करावी.परभणी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे व कॉलनीतील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत.
परभणी शहरामध्ये महिला मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात यावे.परभणी शहरात दिवाळी-दसरा सणावारात सर्व एटीएम मध्ये नोटा उपलब्ध करून देण्यात याव्यात बराच वेळेस सणावारा मध्ये एटीएम मध्ये खडखडाट असतो.
परभणी शहरातील काही गॅस एजन्सीकडून घरपोच साठी प्रत्येक सिलिंडर मागे 30 ते 50 रुपये जादा घेण्यात येतात त्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशा प्रकारच्या एकूण सोळा मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत निवेदनावर एड.माधुरी क्षिरसागर,सुभाष बाकले, संतोष आसेगावकर गंगाधर यादव,उत्तमराव चव्हाण,गणपत राव गायकवाड,मंगला खामगावकर,संदीप साळुंके,सय्यद अझहर, स.मोहसीन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्रमिक विश्व न्युज