परभणी : दि.२२ परभणी जिल्ह्यातील गायरान,वनीकरण धारकांना जमिनी त्यांचा नावावर करण्यात याव्यात व ७/१२ देण्यात यावा.गायरान जमिनी नावे झालेल्या कास्तकऱ्यांचा ७/१२ वरील पोट खराब हा उल्लेख वगळण्यात यावा या प्रमुख मागणी सह १७ विविध मागण्याचा साठी परभणी येथे मोर्चा काढण्यात आला.
जिंतूर रोड वरील ज्ञानोपासक महाविद्यालयाचा प्रांगणातून सुरुवात झालेला मोर्चा उड्डानपूल मार्ग बस स्थानक समोरून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील आंदोलन स्थळी पोचला.तापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बहुसंख्य महिलांचा सह आंदोलन स्थळी सभा घेण्यात आली.
परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये मागावर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी देण्यात यावी.पूर्णा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे.मागासवर्गीय व आदिवासींसाठी आर्थिक तरतूदचा कायदा करण्यात यावा.परभणी शहरात शासनामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा.संजय गांधी,श्रावणबाळ,वृद्धपकाळ या योजनांसाठी २१ हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करावी या सह एकूण १७ विविध मागण्याचे निवेदन मोर्चाचा वतीने शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले.निवेदनावर पप्पूराज शेळके,प्रा.प्रवीण कणकुटे,रघुनाथ कसबे,विश्वजित वाघमारे,ऍड विष्णू ढोले,मारोती साठे यांचा स्वाक्षऱ्या आहेत.
श्रमिक विश्व …