परभणी: कोरोणाच्या वैश्विक महामारी मुळे बंद असलेले शहरातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याच्या शासन निर्णया नंतर आज दिनांक ४ आँक्टोबर रोजी शाळा सुरु झाल्या आहेत.शाळेच्या पहिल्या दिवशी सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे पुष्पवृष्टी करुन विद्यार्थीनींचे स्वागत करण्यात आले.या वेळी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) विठ्ठल भुसारे यांनी मार्गदर्शन केले.
शालेय अभ्यासक्रमा बरोबरच आरोग्यदायी समाज जीवन निर्माण करण्या साठी “आरोग्यमित्रांच्या” भुमिकेतुन विद्यार्थी-शिक्षकांनी कार्यप्रवण व्हावे अशा भावना व्यक्त केल्या.
प्रास्ताविकातुन यशवंत मकरंद यांनी
विद्यार्थ्यां शिवाय शाळा
झाल्या होत्या बेरंग….
आता ओसंडुण येतील
इंद्रधनूष्याचे सप्तरंग….
तर मुख्याध्यापिका सौ.जया जाधव यांनी या शब्दात विद्यार्थीनींचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुशिलकुमार देशमुख,सौ.आशा देशमुख,प्रणिता पांचाळ,अरुणा पाटील,रमेश मुळे,सिताराम ठाकरे,विठ्ठल शिंदे,जगन्नाथ नागरगोजे,मुख्याध्यापिका सौ.जया जाधव आदींनी परिश्रम घेतले.
श्रमिक विश्व न्यूज