यंदाची जागतिक भूक निर्देशांक क्रमवारी जाहिर करण्यात आली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सने ११६ देशांच्या क्रमवारीत भारताला १०१ स्थावर ठेवले आहे. ज्या ३१ देशांमध्ये उपासमारीची समस्या गंभीर असल्याचे मानले गेले आहे त्यामध्ये भारतही आहे. शेजारील देशांच्या तुलनेतही भारतीची पिछेहाट झाली आहे.
पाकिस्तान,बांग्लादेश,श्रीलंका आणि नेपाळ हे देश जागतिक भूक निर्देशांकात अनुक्रमे ९२, ७६,७६ ६५ व्या स्थानावर आहेत. मागील वर्षीच्या जागतिक भूक निर्देशांकात १०७ देशांच्या यादीत भारत ९४ स्थानावर होता.
जागतिक भूक निर्देशांक दर्शवणारी क्रमवारी आज जाहिर करण्यात आली. ११६ देशांची ही क्रमवारी आहे. मागील वर्षी १०७ देशांची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली होती.
भारतापेक्षा फक्त १५ देशांची स्थिती वाईट आहे. यामध्ये पापुआ न्यू गिनी (१०२), अफगाणिस्तान (१०३), नायजेरिया (१०३), कांगो (१०५), मोझाम्बिक (१०६), सिएरा लिओन (१०६), तिमोर-लेस्ते (१०८), हैती (१०९), लाइबेरिया (११०) ), मेडागास्कर (१११), डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (११२), चाड (११३), सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (११४), येमेन (११५) आणि सोमालिया (११६). आदी देशांचा समावेश आहे.
राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर 2030 पर्यंत झिरो हंगरच्या दिशेने प्रगती मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख निर्देशकांचा निर्देशांक मागोवा घेतो. कुपोषण, बालकांचे अत्यंत कमी वजन,बालकांची खुरटलेली वाढ आणि बालमृत्यू या चार निकषांवर १००-बिंदू स्केलवर भूक निर्धारित केली जाते. 0 हा सर्वोत्तम संभाव्य स्कोअर आहे (भूक नाही) आणि 100 सर्वात वाईट आहे. प्रत्येक देशाच्या GHI स्कोअरचे तीव्रतेनुसार कमी ते अत्यंत चिंताजनक असे वर्गीकरण केले जाते,
सोमालियासहित मध्य आफ्रिकन रिपब्लिक, चाड, कांगो डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मादागास्कर, आणि येमेन आदी ५ देशांसहित इतर ३१ देश उपासमारीच्या गंभीर पातळीवर आहेत. २०२१ GHI रँकिंगनुसार सोमालियामध्ये सर्वाधिक उपासमारीची पातळी आहे.
२००० पासून जागतिक उपासमार कमी होत आहे, प्रगती मंद आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (जीएचआय) वर आधारित सध्याचे अंदाज दर्शवतात की संपूर्ण जग – आणि विशेषत: ४७ देश – २०३० पर्यंत कमी उपासमारी कमी करण्यात अपयशी ठरतील.
साभार सत्यशोधक प्रतिशब्द साभार
श्रमिक विश्व न्यूज