“भारतातील गरिबी”

मनोविकास प्रकाशनाचे नवीन पुस्तक

“भारतातील गरिबी” : मनोविकास प्रकाशनाचे नवीन पुस्तक
(पाने १७८, किंमत २०० रुपये)

१९७१ मध्ये वि म दांडेकर आणि नीलकंठ रथ यांच्या मूळ EPW मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंग्रजी प्रबंधाचा (Poverty In India ) मराठीत संक्षिप्त पण मोठा लेख त्यावेळच्या “माणूस” साप्ताहिकात प्रसिद्ध झाला होता ;

श्रमिक विश्व फोटो

लेखातील मांडणीची त्या काळात बरीच चर्चा झाली होती

त्या लेखाला २०२१ मध्ये ५० वर्षे झाली

श्री नंदा खरे यांनी पुढाकार घेऊन मूळ लेख , नीलकंठ रथ यांची , ५० वर्षाचा आढावा घेणारी नवीन दीर्घ प्रस्तावना आणि खरे यांची स्वतःची टिप्पणी असे संकलन करून हे पुस्तक मनोविकासने प्रकाशित केले आहे

भारतासारख्या देशात स्वातंत्र्याची ७५ वर्षे होतांना अजूनही जर कोणता प्रश्न कोट्यवधी भावा बहिणींची , त्यांच्या लहान , तरुण मुलांची आयुष्ये अक्षरशः करपवून टाकत असेल तर तो आहे दारिद्र्याचा

तो प्रश्न पुन्हा पुन्हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या चर्चांच्या केंद्रस्थानी कसा राहील, आणि जीडीपी एके जीडीपीचे आर्थिक तत्वज्ञानला आव्हान कसे दिले जाईल यासाठी सतत सजग प्रयत्न करण्याची गरज आहे

या पुस्तकाचा तो हेतू साध्य होवो

संजीव चांदोरकर

श्रमिक विश्व न्यूज

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here