परभणी : आज आपण सर्वजण एका भीषण स्थितीतून जात आहोत.विविध धर्मांना एकमेकांविरुद्ध झुंजविले जात आहे.द्वेषाचा उन्माद असह्य होत आहे.देशभर छोट्या छोट्या दंगली घडवून दहशतीचे सावट सर्वत्र पसरविले जात आहे.महागाई,बेकारी, शिक्षण आणि आरोग्य या सारख्या मूलभूत प्रश्नावरील लक्ष उडवून धर्माच्या नावाने तरुणांची माथी भडकवली जात आहेत.सत्ता टिकवणे आणि हस्तगत करण्यासाठी या सगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे.आज सर्वसामान्य माणूस महागाई आणि बेरोजगारीने पुरता गांजला आहे.आता तो भयग्रस्त आणि असुरक्षित झाला आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी परभणी शहरातील सामाजिक सलोखा,सदभावना आणि शांतता प्रस्थापित करण्याची व समाधानी,समृद्ध जीवन जगू इच्छिणाऱ्या नागरिकांच्या वतीने जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ दि.०१ सकाळी १० वाजता एकत्र येऊन लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा जागर करण्यात आला.
प्रसंगी ऍड.माधुरी क्षीरसागर,प्रा.दत्ता चव्हाण,प्रा.सुनील मोडक, प्रा.भगवान काळे,कॉ. राजन क्षीरसागर,डॉ.सुनील जाधव,डॉ.धर्मराज चव्हाण,कॉ. संदीप साळुंके,स.अझहर,यांच्या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
@श्रमिक विश्व