परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने सध्या शहरातील मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरु आहे, अश्याच एक प्रकरणामध्ये शहरातील स्टेशन रोड भागातील सिमेंट रस्त्यावर राज्य व केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून डांबरीकरणाच्या कामाची मोहीम महापालिकेने हाती घेतल्याचे दिसून येत आहे. सिमेंट कॉक्रिट च्या रस्त्यावर डांबरी रस्ते करू नयेत असे राज्य शासन, केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश असतांना सुद्धा परभणी शहर मनपा ने निधीचा गैर वापर करून शासकीय निधी व जनतेने भरलेल्या मालमत्ता कर रक्कमेचा गैर वापर केल्याचे दिसून येत आहे, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करून परभणी शहर महानगरपालिकेने शासकीय रक्कमेचा गैर वापर करून चुकीच्या पद्धतीने केलेल्या रस्त्यांची पाहणी करून प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधित कंत्राटदार यांना देण्यात येणारा निधी तात्काळ थांबवावा असे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.