महाराष्ट्रात बालकामगार विषयावर काम करणाऱ्या १२ जिल्ह्यातील ५५ स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या.या संस्थांनी एकत्र येऊन राज्यस्तरीय नेटवर्क स्थापन केले. अपेक्षा होम सोसायटी चे मधुकर गुंबळे यांनी या बैठकीचे नियोजन केले. बच्चू कडू यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. तेलंगणा येथील बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या एम व्ही फौंडेशन चे व्यंकट रेड्डी आवर्जून उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यात या नेटवर्क च्या शाखा स्थापन करण्यात येणार असून बालमजुरी, शाळाबाह्य मुले बालविवाहावर काम केले जाणार आहे. मधुकर गुंबळे यांची राज्य निमंत्रक म्हणून निवड झाली.
या विषयावर ज्यांना काम करायचे आहे त्यांनी जरूर 8208589195 या whatsapp वर मला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव
तालुका
जिल्हा
संस्था असेल तर संस्थेचे नाव
संस्था नसेल तर व्यवसाय
या परिषदेत शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी, हेमांगी जोशी, दीनानाथ वाघमारे,किशोर मोघे, महेश पवार,मुकुंद आडेवार, बाजीराव ढाकणे, नितेश बनसोडे, दीपक नागरगोजे, मनोज देशमुख, ओमप्रकाश गिरी, तुषार हांडे किशोर चौधरी, महेश सूर्यवंशी यासह अनेक महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेरंब कुलकर्णी
श्रमिक विश्व न्यूज