परभणीत बांधकाम कामगारांना देण्यात येतेय निकृष्ट मध्यान्ह भोजन,ठरावा विपरीत कारभार चव्हाट्यावर ...
परभणी:(१३) महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत कामगारांच्या साठी चालवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत आल्याचे आज शनिवार बाजार परभणी येते समोर आले.मध्यान्ह भोजन केवळ बांधकामाच्या ठिकाणी वाटप करण्याचा मंडळाच्या सूचनांना हरताळ फासला जात असून यात लाभार्थी संख्या वाढवण्याच्या एक कलमी कार्यक्रम समोर ठेऊन अनेक ठिकाणी बांधकाम कामे नसलेल्या जागी,कामगार नसलेल्यांना सुद्धा मध्यान्ह भोजन वाटप करून संख्या वाढवली जात असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ठरावानुसार नोंदीत तथा अनोंदीत सक्रीय (जीवित) बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्या बाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे.परभणी शहरातील शनिवार बाजार भागात नाका कामगारांच्या वतीने गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने सूचना करण्यात आल्या होत्या.नोंदीत तथा अनोंदीत असलेल्या नाका कामगारांना गेल्या चार पाच दिवसांपासून देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात निर्धारित बाराशे कँलरिज मिळतील इतका आहार देण्यात येत नसल्याची तक्रार उपस्थित कामगारांच्या वतीने करण्यात आली.मध्यान्ह भोजनात केवळ भात आणि वरण देण्तात येत असल्याने व आज दि.१२ रोजी देण्यात आलेल्या जेवणात भातातून दुर्गंधी येत असल्याने कामगारांनी वाटपासाठी आलेला भात व दाळ रस्त्यावर फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.
ठरावाचा विपरीत कारभार
परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात २२१६६ बांधकाम कामगारांच्या नोंदण्या असून त्यात सक्रीय नोंदी केवळ ४००८ असल्याची माहिती आहे.अश्या स्थितीत मध्यान्ह भोजनाच्या जिल्ह्यात एकूण ३१ वाहनाद्वारे भोजन वाटपाची कामे चालू असल्याची माहिती कळते.मध्यान्ह भोजन योजना केवळ बांधकामे चालू असलेल्या ठिकाणी कामगरांना जेवण पुरवण्याचे पारित ठरवत नमूद केले असतांना मोठ्या संख्येने जेवण वाटपाची चौकशी करण्याची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रमिक विश्व न्यूज