परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयाचा इमारती बाबत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ( NHM ) अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या दर्गा रोड स्थित इमारत हि २०१८ पासून सुरुवातीचे काही महिने काम रडखडल्या नंतर २०२० पर्यंत बांधकमाने चांगली गती घेतल्याने काम जवळपास पूर्णत्वास आलेले होते.
रुग्णालयाच्या इमारत कामावर तो पर्यंत १४.४० लक्ष येवढा निधी खर्च झाला झाल्या नंतर १०० खाटांचे माता व बाल संगोपन दवाखाना प्रस्तावित असलेल्या या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एम सी एच विन्ग इमारतीचे बांधकाम २०२० पासून ८.२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध प्रश्नी रडखडले.बाबत सुधारित निधीची मागणी केंद्राचा आरोग्य विभागाकडे करून हि एक वर्षाचा कालावधी झाल्या नंतर परभणी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था पाहणी करून जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयावर येणाऱ्या अतिरिक्त ताणांच्या बाबत उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली.परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या सातत्याने घेण्यात आलेल्या आढाव्या मुळे उर्वरित निधी उपलब्ध होऊन माता व बाल संगोपन रुग्णालयाची इमारत अखेरीस पूर्णत्वास गेली आहे.
परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण करण्यासाठी माता व बाल संगोपन रुग्णालय जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाचे ठरणारे आहे.
सचिन देशपांडे : ७०३८५६६७३८
श्रमिक विश्व न्युज