समृद्धी महामार्ग बाधीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे परभणी जिल्हाधिकारी कचेरीवर दिनांक ४ जुलै रोजी प्रचंड धरणे आंदोलन.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
१) शेतकऱ्यांच्या जमिनीची कवडीमोल भावाने किंमती देणाऱ्या नांदेड – जालना समृद्धी महामार्ग चे महाराष्ट्र महामार्ग कायदा १९५५ अन्वये काढण्यात आलेले भुसंपादन नोटीफीकेशन रद्द करा.
२) भुसंपादन व पुनर्वसन कायदा २०१३ अन्वये बाजारभावाच्या १० पट किंमत द्या.
३) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि कायदेशीर सुविधा अनुदान अदा करा.
४) समृद्धी महामार्ग प्रकल्पा विरुद्ध आंदोलनाचे गुन्हे तत्काळ मागे घ्या.
आंदोलनात या व अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी समृद्धी ग्रस्त शेतकरी व किसान सभेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कॉ शिवाजी कदम,कॉ. ओंकार पवार,कॉ. मुजा लिपणे,कॉ. प्रल्हाद पडूळ,धोंडीराम लांबाडे,शेख आब्दुल भाई,गोविंदराव घाटोल,संदेश देसाई,विठ्ठल धस,कृष्णा बोबडे,पुंडलीक जोगदंड,सत्यवान बुलंगे,अशोकराव रंहेर,शिवाजीराव चोपडे,प्रभाकर किरगे,आनंदराव सोनटक्के,अशोक वैद्य यांच्या सह बहुसंख्य शेतकरी सहभागी होते.
श्रमिक विश्व
सचिन देशपांडे : ७०३८५६६७३८