शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये शिवसेनेच्या वतीने आज दिनांक 8 जुलै रोजी शहरातील मूलभूत प्रश्नांना घेऊन शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला .
परभणी शहर महानगरपालिका कार्यालयाच्या अंतर्गत गेल्या दोन वर्षापासून हुकुमशाही पद्धतीने शासकीय कारभार राबविण्यात येत असल्याचा संताप मोर्चेकऱ्यातून व्यक्त करण्यात आला .

परभणी शहरातील मालमत्ता घरपट्टी फेर तत्काळ सुरू करावी, परभणी शहरातील रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे रेल्वे हद्दी बाहेरील 30 मीटर च्या आत असलेल्या घरकुलांचा लाभ देण्यात यावा .
परभणी शहरातील वाढणाऱ्या धुळीवर उपाय योजना करावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या शहर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले प्रसंगी महिला आघाडी अंबिका डहाळे शिवसेना विभाग प्रमुख अशोक गव्हाने अविनाश अवचार अर्जुन पंडित यांच्यासह बहुसंख्य महिला व नागरिक सहभागी झाले

श्रमिक विश्व साठी सचिन देशपांडे,
परभणी

#शिवसेना आक्रोश मोर्चा # परभणी मनपा #श्रमिक विश्व #परभणी #Parbhani

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here