साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते आज अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते
बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व लाभार्थ्यांना विविध योजनेंतर्गत धनादेश प्रदान करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण आर्टीची सुरुवात करीत आहोत हा राज्यात एक सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा टप्पा आहे. अण्णा भाऊ साठे यांचा रशियातील पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रशियात गेलो तेव्हा त्यांचे विचार ऐकल्यानंतर अभिमान वाटला.- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी जे उत्तुंग कार्य केले आहे ते कधीही विसरता येणार नाही. घाटकोपरमधील चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येईल. – उपमुख्यमंत्री अजित पवार.
श्रमिक विश्व