संजीव चांदोरकर
फक्त ग्राहक एके ग्राहक बनून उपभोगत गर्क राहू नका ; व्यापक प्रश्न विचारा , भूमिका घ्या !
या सगळ्यात स्पर्धा लोप पावत आहेत , पारदर्शी पण नाही , हे सगळे छोट्या उपदकांच्या आर्थिक हिताच्या विरोधी आहे, त्यातून मक्तेदार कंपन्या जन्माला येत आहेत ;
गुगल सर्च इंजिन वर तुम्ही काही सर्च करता आणि गुगल आपल्या अनेक प्रॉडक्ट / सेवाच फक्त तुम्ही निवडाल अशा पद्धतीने रिझल्ट्स दाखवते
तुम्ही उबेर वरून टॅक्सी बुक करता आणि उबेर, उबेर कडे भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या टॅक्सीवाल्याला नव्हे , तर उबेरच्या स्वतःच्या मालकीच्या टॅक्सीला पूढे दामटते
अमेझॉनवर तुम्ही काही खरेदी करता आणि अमेझॉन इतर उत्पदकांच्या वस्तू नव्हेत “प्रायव्हेट लेबल्स”च्या नावाखाली स्वतः सबकॉन्ट्रॅक्टींगने बनवून घेतलेल्या वस्तू तुम्ही खरेदी कराल हे बघते
स्विगी / झोमॅटो वरून खाद्यवस्तू मागवतांना स्विगी / झोमॅटो , इतर रेस्टोरंटस मधून नाही , त्यांच्या व्हर्च्युअल किचन मधून तुम्ही खाद्यपदार्थ मागवाल हे बघते
तीच गोष्ट विविध वित्तीय प्रॉडक्टस , व इतर अनेक सेवा “प्लॅटफॉर्म इकॉनॉमी” मधून दिल्या जातात , यापुढे जाणार आहेत , त्यांच्या बाबतीत होत आहेत / होणार आहेत
हे सगळे एव्हढ्या सट्ल / नकळत होत असते कि आपल्या लक्षात देखील येणार नाही
या सगळ्यात शासनसंस्था कोठे आहे ? नियमांचे पुस्तक कोठे आहे ? अंपायर कोठे आहे ? का मार्केट म्हणजे बळी तो कान पिळी वाले एक जंगल होणार आहे ?
या सगळ्यात स्पर्धा लोप पावत आहेत , पारदर्शी पण नाही , हे सगळे छोट्या उपदकांच्या आर्थिक हिताच्या विरोधी आहे, त्यातून मक्तेदार कंपन्या जन्माला येत आहेत ;
“पण मला काय त्याचे, मला हवी ती वस्तू किंवा सेवा मिळत आहे” बस्स झाले असे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला
पण तरुण पिढी अधिक विचारी आहे या सगळ्याचे गंभीर आर्थिक व राजकीय परिणाम होऊ शकतात याचे भान तिला येत आहे
टेक सॅव्ही , जागतिक राजकीय आर्थिक कॅनव्हास वर विचार करू शकणारे, राजकीय भूमिका घेणारे तरुणच याला प्रतिशक्ति उभ्या करू शकतात
संजीव चांदोरकर.