‘ई-श्रम’ असंघटित कामगारांसाठी केंद्राचे नवे डाटाबेस पोर्टल कार्यरत …

३८ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष.

देशभरातील असंघटित कामगारांचा एक आधार आधारित केंद्रीयकृत डाटाबेस बनवून ज्यात निर्माण क्षेत्रातील कामगार,प्रवासी कामगार,फेरीवाले,घरेलू कामगार,शेतमजूर इत्यादींसाठी केंद्र सरकारच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी ‘ई-श्रम’ संकेतस्थळाचे गुरुवारी (२६ ) अनावरण केले.

फोटो गुगल साभार

अधिक माहिती करिता :

www.labour.gov.in

असंघटित कामगारांसाठी ‘ ई – श्रम ‘ संकेतस्थळावर कामगारांना नोंदणी करिता आधार क्रमांक अनिवार्य असून ओटीपी,बोटांचे ठसे आणि सक्रिय बँक खाते व सक्रिय मोबाईल क्रमांक आणि अनिवार्य असेल या व्यतिरिक्त या पैकी शिक्षणाचे,उत्पन्नाचे,व्यवसायाचे किंव्हा कौशल्याचे प्रमाणपत्र जोडून नोंदणी करणे आवश्यक आहे.

संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी ?

असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.यासाठी १४४३४ हा राष्ट्रीय नि:शुल्क संपर्क क्रमांक तयार करण्यात आला असून त्यायोगे कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल.कामगारांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकच्या सहाय्याने ई-श्रम खाते संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.याचबरोबर जन्मदिनांक,मुळगाव,संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल.कामगारांना बारा अंकी अनोखा सांकेतांक ( युनिककोड ) असलेले ई-श्रम ओळखपत्र दिले जाईल त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here