Film superhit करणारी जी खरी जनता होती, ती गोरगरीब जनता होती.

Multiplex च्या आगमनाने single screen theatre झाकोळले. निलेश अभंग

0
237

Film superhit करणारी जी खरी जनता होती, ती गोरगरीब जनता होती.

जॅकी, अनिल कपूर, अजय, अक्षय, सुनील, गोविंदा, मिथून यांना superstar केले ते ह्या single screen theatre ला गर्दी करणाऱ्या गरीब श्रमिक कष्टकरी जनतेने.

Multiplex च्या आगमनाने single screen theatre झाकोळले.

श्रमिकांना multiplex परवडले नाही, single screen theatre वाले जमेल तितका multiplex सारखा तामझाम करण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यामुळे single screen ना धड श्रमिक गरिबांचे राहिले, ना सधन मध्यमवर्गियांचे.

1991 नंतरच्या नवश्रीमंत वर्गाने 2007-08 पर्यंत चांगलेच बाळसे धरले होते. त्यामुळे त्यांना multiplex परवडू लागले होते.

Single screen theatres मधल्यामध्ये मेले.

कल्याणच्या सागर टॉकीजला, जोकरला, कृष्णाला बरेच सिनेमे पाहिले. प्रेक्षक गच्च भरलेले असत. सारे गरीब, श्रमिक, नाका कामगार, हमाल वगैरे असते. केवळ वीसेक टक्के मध्यमवर्गीय असत. Interval ला Canteenचाही उत्तम धंदा होत असे.

सिनेमा हिट करणारी, Superhit करणारी, सुपरस्टार बनवणारी ही जी भली मोठ्ठी जनता होती, तिला आजच्या महागाईत थेटरला जाऊन सिनेमा पाहणे परवडत नाही. आता त्यांचे हक्काचे single screen theatre शहरात राहिलेले नाहीत. देशात जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर, महागाई, कोरोना, lockdown ने गरिबांचे खस्ताहाल झाले आहेत.

गेल्या सात आठ वर्षांत एवढा मोठा समुदाय सिनेमा, थेटर ह्या क्षेत्रापासून दूर फेकला गेला.

सिनेमा चालत नाहिये, OTT आला वगैरे ही वरवरची कारणे आहेत, खरे कारण आहे, इथली मोठी श्रमिक मेहनतकश जनता थेटर ह्या संकल्पनेपासून थेट बेदखल केली गेली, नवउदारमतवादाने हा ग्राहकवर्ग मोजलेलाच नाही, त्यांना ह्या वर्गाची गरजच नाही, असे त्यांचे वागणे आणि धोरणे आहेत. आम्ही ह्या वर्गाच्या सहभागाशिवायही बिजनेस करू शकतो, असेच त्यांचे निर्णय आणि Policies आहेत.

त्यामुळे आज कोणताही सिनेमा सहज यशस्वी होत नाहीये, जवळजवळ पन्नास टक्के established ग्राहकवर्गाच्या आर्थिक स्तराचा विचार न करता जर Business Companies policy फ्रेम करत असतील, तर सिनेमे चालतीलच कसे.

हा गरीबगुरबा वर्ग जर ह्या ecosystem मध्ये involve असता तर ह्या वर्गाने Boycott वगैरे गोष्टींना असे फाट्यावर मारत सिनेमे Hit केले असते. Ott वगैरेचा तर ह्या वर्गाशी अजून संबंधही आलेला नाही.

नवउदारमतवादाने मुख्य ग्राहकालाच हद्दपार करत बिजनेस करण्याची टेक्निक शोधली खरी, मात्र आता उरलेल्या लोकांत (ग्राहकांत) त्यांचे भागेल की नाही, याबाबत मात्र प्रश्नचिन्हच आहे.

ही छानछोकी फार काळ टिकवून ठेवता येत नाही. आचक्यांचा आवाज आताच येऊ लागला आहे.

निलेश अभंग, कल्याण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here